नगरमध्ये कार्यकर्त्यांच्या दोन गटांत राडा

अहमदनगर – मतदानाच्या आदल्या दिवशी नगर शहरातील जुना वाद उफाळून आल्याने दोन गटांत राडा झाला आहे माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले. यात वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत सागर मुर्तडकर यांचे कार्यालय फोडण्यात आले असून एका स्कार्पिओ वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही गटाच्या हाणामारीत स्कॉर्पिओ कारच्या पाठिमागील व समोरील काचा फोडण्यात आल्या. अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात या घटनेने तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top