अमरावती- अमरावती येथील माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या घरासमोर गायीची कत्तल करणार असल्याचे म्हटले आहे. पत्र पाठवणाऱ्याने स्वत:चे नाव आमिर असे लिहिले आहे. त्याने १० कोटी रुपयांची खंडणी मागून पाकिस्तान झिंदाबाद असेही लिहिले. आरोपीने चिठ्ठीत आपला फोन नंबर लिहिला आहे. पत्रात नवनीत राणा यांच्याबाबत आणखी अनेक आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आले आहेत. त्यांचे पती रवी राणा यांच्याबद्दल अशोभनीय गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. या प्रकरणी रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
