नांदेड जिल्हांतर्गत बस सेवा अचानक बंद! प्रवाशांची गैरसोय

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आज अंतर्गत बससेवा अचानक बंद करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु होते. जिल्हयात गेल्या दोन दिवसात एक एसटी बस जाळण्यात आली असून, दुसऱ्या एका बसवर दगडफेक करण्यात आली होती. दोन दिवसात या दोन घटना समोर आल्याने आज नांदेड जिल्ह्यात जिल्हाअंतर्गत एसटी बस सेवा सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती.

इतर आगारातून आणि विभागातून ज्या गाड्या रात्री मुक्कामी आल्या होत्या त्या सकाळी सोडण्यात आल्या. मात्र, नांदेड आगार आणि जिल्ह्यांतील डेपोमधील एसटी बसेस सोडण्यात आल्या नाहीत. अचानकपणे घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठीच्या आंदोलनाचे पडसाद नांदेड मालेगाव रस्त्यावर पहायला मिळाले. इथे एका अज्ञात इसमांनी प्रवासी असलेली बस पेटवून दिली होती. मात्र प्रवासी सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच १३ सप्टेंबरला पुन्हा एकदा एका बसवर दगडफेक करण्यात आली. याची गंभीर दखल राज्य परिवहन मंडळाने घेतली असून, आज नांदेड जिल्ह्यातील अंर्तगत बस सेवा बंद ठेवण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top