नांदेड – नांदेड – पुणे व नागपूर-नांदेड या मार्गावरील विमानसेवा मागील तीन दिवसांपासून काही तांत्रिक अडचणीमुळे बंद केली आहे. मागील तीन वर्षांपूर्वी बंद पडलेली नांदेडमधील विमानसेवा एप्रिल २०२४ पासून पुन्हा एकदा सुरू केली होती .पहिल्या टप्यात दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, हैद्राबाद या ठिकाणी विमानसेवा सुरू झाली. परंतु पुणे व मुंबईसाठी प्रतिक्षा करावी लागली. त्यानंतर २७ जूनपासून नांदेड-पुणे व नांदेड-नागपूर विमानसेवेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे मराठवाड्यात नांदेडहून नागपूरकडे जाणारी पहिली स्टार एअरची विमानसेवा या ठिकाणी कार्यरत होती. आठवड्यातून सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार असे चार दिवस नांदेड-पुणे, नांदेड-नागपूर ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र फक्त अडीच महिने सुरळीत चालल्यानंतर नागपूर- नांदेड व नांदेड-पुणे या मार्गावरील विमानसेवा मागील तीन दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे बंद केली आहे. ही सेवा ३० सप्टेंबरपर्यंत केली आहे आणि त्यानंतर ती बंद करणार, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले.