नागझिरा येथे वाघिणीने दिला चार पिल्लांना जन्म

नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे एका वाघिणीने चार पिल्लाना जन्म दिला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय, ब्राम्हपुरी पर्वत रांगेतील आणखी दोन वाघिणी लवकरच एनएनटीआरमध्ये सोडल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
एनएनटीआरचे फील्ड डायरेक्टर जयराम गौडा आर म्हणाले की, टी -४ वाघीण अलीकडेच तिच्या चार शावकांसह फिरताना दिसली. अभयारण्यातील वाघांची संख्या आणखी वाढणार असल्याने हे चांगले लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, वाघाच्या पिल्लांचे वय चार ते पाच असल्याचा अंदाज आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अखिल भारतीय व्याघ्र अंदाज अहवालानुसार, एनएनटीआर मध्ये सध्या १२ते १७ वाघ आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top