नाना पटोलेंना महिन्याला एक खोका पोहोचतो? आशिष देशमुख यांचा पटोलेंवर गंभीर आरोप

नागपूर:- छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित राहिल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. नाना पटोलेंना दर महिन्याला एक खोका मिळतो, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी केला. यासह, १६ एप्रिलला पटोले गुवाहाटीत असतील, असेही देशमुख म्हणाले आहेत. देशमुख यांनी लावलेल्या आरोपांमुळे काँग्रेसच्या नेत्यांमधले मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

आशिष देशमुख म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला नाना पटोले गैरहजर होते. मात्र, त्यानंतर ते ठणठणीत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. प्रदेशाध्यक्ष हे सुरतच्या मार्गावर होते आणि सुरतच्या मार्गावर कोण असते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. १६ तारखेला मविआची नागपुरात सभा आहे तोपर्यंत आमचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे गुवाहाटीपर्यंत पोहोचल्याचे आपल्याला पाहायला मिळेल.

देशमुख पुढे म्हणाले, \’आपल्या लक्षात येईल की या नवीन सरकारमधील जे प्रमुख आहे त्यांच्या विरोधात आमचे प्रदेशाध्यक्ष कधीच बोलताना दिसत नाहीत. पण उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात, भाजपच्या विरोधात सातत्याने बोलताना दिसतात. यामागे \’तो\’ खोका कारणीभूत आहे का, हा देखील प्रश्न उपस्थित होतो.\’

Scroll to Top