नागपूर : सध्या राज्यात वेगवेगळ्या नेत्यांची ‘भावी मुख्यमंत्री’ अशी पोस्टर झळकत आहेत. त्यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भर पडली आहे. नागपूर आणि भंडारा येथे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे.
ग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा ५ जून रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्यानिमीत्ताने त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर भंडाऱ्यात लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय शेतकरी पुत्र, कामकरी लोकांचे कैवारी असाही उल्लेख या बॅनरवर आहे. नागपुरात गिरीश पांडव हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी नाना पटोले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असे बॅनर लावले आहेत, अशी चर्चा आहे
या बॅनरविषयी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, “भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेल्या पोस्टरविषयी मला समजले, मात्र अशा प्रकारचे पोस्टर्स कोणीही लावू नयेत. माझा वाढदिवस मला सामाजिक कार्य करत साजरा करायचा आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना हवे तसे शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत मी हा वाढदिवस साजरा करणार आहे.
नाना पटोले भावी मुख्यमंत्री! भंडारा-नागपुरात पोस्टरबाजी
