नांदेड- नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. नांदेड मधील धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथे ही घटना घडली. २३ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. इरबा मोहनराव कदम (३१) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. बाभळी धनगर येथे इरबा यांनी शेतातील नापिकीला कंटाळून तसेच त्या शेतीवरील बँकेचे कर्ज फेडण्याच्या चिंतेत स्वतःच्या राहत्या घरी नऊवारी साडीने गळफास लावून आत्महत्या केली.
नापिकी आणि कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
