वसई – नायगावच्या कोळीवाड्यात असलेल्या वाल्मिकेश्वर तलावात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड गाळ साचला होता.त्यामुळे महिलांचे कपडे-भांडी धुण्यासाठी हाल होत होते. मात्र ग्रामस्थांच्या श्रमदानातून या तलावाची आता साफसफाई करण्यात आली आहे.
श्री वाल्मिकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या आर्थिक मदतीतून आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून या तलावाचे गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते.यावेळी जव्हा , मोखाडा,विक्रमगड आणि वाडा येथील मजुरांनी तर एक तास कोणतीही मजुरी न घेता काम केले.त्यामुळे आता या तलावातील गाळ पूर्णपणे निघाला आहे.हा तलाव स्वच्छ झाला आहे. आता महिलांना भांडी आणि कपडे धुण्यासाठी पुन्हा हे पाणी वापरता येणार आहे. त्यामुळे महिलांनी देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.
नायगावचा वाल्मिकेश्वर तलाव ग्रामस्थांच्या श्रमदानातून स्वच्छ
