मुंबई – मुंबई महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात सध्या रेडिओथेरपीसाठी इमारत उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत केल्या जाणार्या खोदकामाच्या आवाजाने निवासी डॉक्टर आणि रुग्ण हैराण झाले आहेत. हे काम सकाळी ९ ते रात्री २ वाजेपर्यंत सुरू असते.
या इमारतीच्या खोदकामासाठी मोठ्या मशीनचा वापर केला जातो. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात आवाज होत असतो.परिणामी निवासी डॉक्टरांना रात्री अभ्यासात लक्ष लागत नाही आणि झोपही येत नाही.तसेच रुग्णांनाही या आवाजाचा त्रास जाणवत आहे. याबाबतच्या तक्रारी डॉक्टरांनी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत. त्यासंदर्भात मार्डचे अध्यक्ष डॉ. वर्धमान रोटे यांनी सांगितले की,हे काम रात्री २ वाजेपर्यंत चालते,ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करावे.आम्ही उशिरा चालणारे काम थांबवण्याचा प्रयत्न केला.पण ते थांबतच नाही.आम्ही अधिष्ठाता यांच्याकडेही याबाबत तक्रारी केल्या आहेत. अधिष्ठाता डॉ.प्रवीण राठी यांनी या परिस्थितीच्या माहितीला दुजोरा दिला आहे.या बांधकामामुळे आवाज जास्त होत आहे हे त्यांनीही मान्य केले असून मी एचआयसी विभागाशी संपर्क करून माहिती घेत आहे,असे राठी यांनी म्हटले आहे.
‘नायर”मधील खोदकामामुळेनिवासी डॉक्टर, रुग्ण हैराण
