मुंबई- नालेसफाईचे १०० टक्के काम ३१ मेपर्यंत पूर्ण होणार आहे. आतापर्यंत ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला. मात्र पालिकेचा दावा खोडून काढत अनेक ठिकाणी कामच पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात पालिकेचा दावा वाहून जाईल, अशी टीका मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
दरवर्षी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचते त्यामुळे मुंबई महापालिकेला टीकेला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यासाठी नालेसफाईची कामे ६ मार्चपासून सुरू करण्यात आली असून ३१ मे पर्यंत नाल्यातील १०० टक्के गाळ उपसा करण्याचे धोरण असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. दरम्यान, आतापर्यंत ९८ टक्के गाळ उपसा केला असून उर्वरित २ टक्के काम पुढील तीन ते चार दिवसांत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. ९८ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचे डॅशबोर्डने जाहीर केले आहे. मात्र पालिकेचा हा पोकळ दावा असून पहिल्या पावसात सगळे समोर येईल, असेही रवी राजा यांनी सांगितले.
नालेसफाईचा पालिकेचा दावा पहिल्याच पावसात वाहून जाईल!
