नाशकात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला रुग्णसंख्या १६४ वर पोहोचली

नाशिक

नाशिक शहरात डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव वाढला आहे. मागील १५ दिवसांत डेंग्यूचे तब्बल ६० नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या आता १६४ वर पोहोचली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली. नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव कायम असताना, आता डेंग्यूचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे नाशिककर चिंतेत आहेत.

नेहमी पावसाळा सुरु झाला कि, डेंग्यूचे रुग्ण आढळतात. मात्र यंदा, उन्हाळ्यातच डेंग्यू आजाराने डोके वर काढले. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर तर या आजाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्याने वैद्यकीय विभागाच्या अडचणींत वाढ झाली आहे. गोविंदनगर परिसरातील ५० वर्षीय पुरुषाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्यामुळे या साथीचे गांभीर्य वाढले आहे. तुलनेत मे महिन्यापासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मे महिन्यात डेंग्यूचे नाशकात ३५ रुग्ण आढळले होते. तर या महिन्यात डेंग्यू आणखी बळावला. दरम्यान, डास निर्मूलनासाठी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली धूर फवारणी, जंतुनाशकाची फवारणी मोहीम केवळ कागदावरच राहिल्याने डेंग्यूसारख्या आजारांची साथ वाढत असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top