नाशिक – बागलाण तालुक्याच्या तांदूळवाडी शिवारातील गोप्या डोंगराच्या पायथ्याशी या मादी बिबट्या आणि तिच्या एक वर्षांच्या बछड्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बिबट्यांचा मृत्यू कुठल्याही विष प्रयोगामुळे झाला नसून वातावरणातील प्रखर उन्हामुळे या बिबट्या मायलेकरांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.
बागलाणमध्ये उन्हामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. दीड वर्षांपूर्वी बिबट्याचा येथे असाच मृत्यू झाला होता. ताहाराबाद वनपरिक्षेत्र अंबासन ते मुल्हेर क्षेत्रात 150 ते 200 बिबटे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.ताराबाद आणि वनपरिक्षेत्रचे अधिकारी शिवाजी सहाणे आणि कर्मचार्यांनी या बिबट्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.
नाशकात प्रखर उन्हामुळे बिबट्या व बछड्याचा मृत्यू
