निफाडमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

नाशिक

नाशिकच्या निफाडमधील खडक माळेगावचे सुपुत्र, भारतीय लष्कराचे जवान योगेश सुखदेव शिंदे यांचे शुक्रवारी सायंकाळी अपघाती निधन झाले. ते गावी सुट्टीसाठी आले असता त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या या अपघाती मृत्यूने तालूक्यात शोककळा पसरली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जवान योगेश यांनी भारतीय सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा होती.

मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना श्रध्दांजली वाहताना म्हटले की, भारतीय सैन्यात कार्यरत असलेले आपल्या नाशिक जिल्ह्यातील खडक माळेगावचे सुपुत्र योगेश सुखदेव शिंदे यांच्या अपघाती निधनाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारतमातेच्या या वीर सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली ! शिंदे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top