काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड 31 मेपासून 4 दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. दोन्ही देशांमध्ये संबंध मजबूत करण्यासाठी प्रचंड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. डिसेंबर 2022 मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रचंड पहिल्यादाच द्विपक्षीय विदेश यात्रा करत आहेत.
नरेंद्र मोदींनी दिलेल्या आमंत्रणानंतर प्रचंड भारत दौऱ्यावर येत आहेत. 68 वर्षीय प्रचंड यांच्यासोबत त्यांच्या कन्या मुलगी गंगा दहल यादेखील भारतात येणार आहेत. नेपाळच्या विदेश मंत्रालयाने सांगितले की, दौऱ्यात सर्वात प्रथम प्रचंड राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत.1 जून रोजी प्रचंड मोदींसोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. त्यानंतर दोन्ही देशांचे पंतप्रधान संयुक्त पत्रकार परिषद घेतील. 3 जून रोजी काठमांडू जाण्याआधी प्रचंड मध्य प्रदेशच्या उज्जैन आणि इंदौर शहराचा दौरा करणार आहेत. प्रचंड हे भारत दौऱ्यावर येणारे नेपाळचे चौथे पंतप्रधान आहेत.
नेपाळचे पंतप्रधान 31 मेपासून चार दिवसीय भारत दौऱ्यावर
