*३५० कलाकारांचे सादरीकरण
मुंबई
मुंबई हे देशातील सांस्कृतिक केंद्र असून कला महोत्सव, कलादालने, वस्तुसंग्रहालये हे या शहरातील जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहेत. ही संस्कृती जोपासत मुंबईतील नेहरू सेंटर येथे मुंबई आर्ट फेअरच्या चौथ्या पर्वाल सुरुवात होणार आहे. त्यानुसार ५ मे ते ७ मे या कालावधीत हे आर्ट फेअर होणार आहे. ‘मूर्त-अमूर्त कला संगम’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या कला प्रदर्शनात प्रस्थापित कलाकारांपासून उदयोन्मुख कलाकारांपर्यंत ३५० कलाकार एकत्र येणार आहेत.
याठिकाणी देशभरातील वैविध्यपूर्ण चित्रांचे प्रदर्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, अँबस्ट्रॅक्ट, वास्तवदर्शी चित्रे, शहरचित्रे, धार्मिक चित्रांपासून ते वैयक्तिक अनुभूतींपर्यंत विविध शैली व विषयांवरील चित्रे त्यांच्यात सखोल दडलेल्या अर्थासह येथे पाहता येणार आहेत. वास्तवाऐवजी भावना, संवेदना, कल्पना आणि विषयभावांवर भर देत विविध कलाकार आणि शैली एकत्रित आणणे हे मुंबई आर्ट फेअरच्या चौथ्या पर्वाचे उद्दिष्ट आहे