नोकरीचे आमिष दाखवून डांबलेल्या २५० भारतीयांची कंबोडियातून सुटका

नवी दिल्ली – कंबोडियात अडकलेल्या २५० भारतीयांना देशात परत आणण्यात आले आहे. कंबोडियातील भारतीय दूतावासाने कंबोडियन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने २५० भारतीय नागरिकांची सुटका करून भारतात परत पाठवले. या भारतीयांना नोकरीचे आमिष दाखवून कंबोडियात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडून तेथे सायबर फसवणुकीशी संबंधित कामे करून घेण्यात येत होती. यापैकी गेल्या ३ महिन्यांत ७५ जणांची सुटका करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ही माहिती दिली.
अजूनही कंबोडियात सुमारे ५ हजार भारतीय अडकले आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भारतीयांना कंबोडियात बळजबरीने ठेवण्यात आले असून त्यांना भारतीय नागरिकांची सायबर फसवणूक करण्यास भाग पाडले जाते. स्वतःला अंमलबजावणी अधिकारी म्हणवून भारतीयांना गडा घालण्याचे काम त्यांना करावे लागते.सरकारचा असा संशय आहे की फसवणूक करणाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत भारतीयांची ५०० कोटी रुपयांची फसवणूक केली असून कंबोडिया सरकार त्यांना मदत करत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना अशा फसवेगिरीपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top