नवी दिल्ली: नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणी लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलासा दिला आहे. राजदच्या लालू यादवांसह खासदार मीसा भारती यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
लालूप्रसाद यादव, राबडी देवी आणि मिसा भारती राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर झाले. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने या सर्वांना समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले. लालू यादव रेल्वेमंत्री असताना लोकांना रेल्वेत नोकऱ्या देण्याऐवजी त्यांच्या जमिनी घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी १८ मे रोजी गुन्हा दाखल केला होता. दिल्ली येथील न्यायालयात लालू, राबडी यांनी मीसा यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
२००४- २००९ च्या दरम्यान जेव्हा लालू यादव रेल्वे मंत्री होते. तेव्हा रेल्वेमधील गट डी नोकरीच्या बदल्यात लालू कुटुंबाला भेटवस्तू किंवा अगदी कमी किंमतीत जमीन मिळाली. नोकरीच्या बदल्यात जमीन या घोटाळ्याच्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपानुसार, लालू यादव रेल्वेत तात्पुरत्या स्वरुपात रेल्वेत नेमणूक करायचे आणि जमीन करार पूर्ण झाल्यावर नोकरीवर ते नियमित केले जायचे. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात, सीबीआयने ऑक्टोबरमध्ये दिल्लीत आरोपीविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात ईडीने दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशातील १५ ठिकाणी छापे मारले. या आरोपांतर्गत ईडी आणि सीबीआय यांच्याकडून लालू यांची चौकशी सुरू आहे.