नोव्हेंबरमध्ये १३ दिवसबँकांचे काम बंद राहणार

नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. या बरोबरच या महिन्यातील ५ शनिवार व ४ रविवार असे एकूण ९ दिवस शेअर बाजारही बंद राहणार आहे.रिझर्व बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार विविध सणांमुळे देशभरातील बँकांचे काम १३ दिवस बंद राहणार आहे. या काळात ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येतील. महाराष्ट्रातील दिवाळी पाडवा, त्रिपुरा, कर्नाटक, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, मेघालय, सिक्कीम व मणिपूरमधील दिवाळी व कुट महोत्सव, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान मधील गोवर्धन पूजा, नववर्ष दिन, ७ व ८ नोव्हेंबरला बंगाल, बिहार, झारखंडमधील छट पूजा, १२ नोव्हेंबरला चंदीगड, ओडिशा, नागालँड सह इतर अनेक राज्यात साजरा होणार ईगाल बग्वाल, १५ नोव्हेंबरला गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा, १८ नोव्हेंबरला कर्नाटकातील कनकदास जयंती या बरोबरच शनिवार व रविवार असे एकूण १३ दिवस कामकाज होणार नाही.