गडचिरोली- आपल्या विरोधात निकाल दिल्याने पोलीस निरीक्षक राजेश खांडवे याने न्यायाधीशांना घरी जाऊन धकावले. याप्रकरणी राजेश खांडवे याला पोलिसांनी अटक केली आहे. कोठडी सुनावल्यानंतर त्याची चंद्रपूरच्या कारागृहात रवानगी करण्यात आली.
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान २० एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी अतुलगण्यार पवार यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी चामोर्शीत आंदोलन झाले. मात्र पोलीस निरीक्षकावर कारवाई झाली नाही. त्यामुळे अतुल गण्यारपवार न्यायालयात गेले. चामोर्शी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मेश्राम यांनी २० मे रोजी कलम २९४, ३२४, ३२६ नुसार राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राजेश खांडवे न्यायाधीशांच्या घरी जाऊन त्यांना धमकवल्याचा प्रकार उघड झाला होता. न्यायाधीश मेश्राम यांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगितली. त्यांनतर गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हा राजेश खांडवे याच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अखेर ३ जून रोजी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक करण्यात आली.
न्यायाधीशांना धमकावले! पोलीस निरीक्षकास अटक
