बॉम्बशोधक म्हणून वापरणार
न्यूयॉर्क: २०२० मध्ये पोलिसांकडून झालेल्या काही क्रूर घटनांमुळे तसेच डिफेन्ड पोलिसांवरील खर्च कमी करण्यासाठी रोबो डॉग ही मोहीम हाती घेतली होती. मात्र यावर येथील नागरिकांसह न्यूयॉर्कमधील महापौरपदाच्या डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार माया विली यांनी रोबो हे पैशाची उधळपट्टी आणि न्यूयॉर्ककरांसाठी धोक्याचे असल्याचे म्हणत पोलिसांकडून या रोबोटच्या वापरावर टीका केली होती. त्यांनतर आता पुन्हा एकदा पोलिस विभाग डिजीडॉगची नियुक्ती करत आहेत. एनवायसीचे महापौर एरिक एडम्स यांनी मंगळवारी एका पत्रकार परषदेत ही बातमी जाहीर केली आहे.
न्यूयॉर्कमध्ये काही वर्षांपूर्वी पोलिसांच्या पथकासोबत एक डॉग रोबोट आणण्यात आला होता. हा प्रशिक्षित डॉग अनेक वाहनांना टाळत पुढे जात असे. सुमारे ३३ किलो वजनाचा हा रोबोट डॉग पाहून लोक थक्क झाले होते. या रोबोट डॉगकडे कॅमेरे, संपर्क यंत्रणा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता होती. तो पोलिसांच्या ताकदीपेक्षा अधिक ताकदीचा दिसत होता. त्यावेळी असे आणखी रोबो पोलीस दलात लवकरच येणार असे घोषित करण्यात आले होते. २०२० मध्ये पोलिसांकडून झालेल्या काही क्रूर घटनांमुळे तसेच डिफेन्ड पोलिसांवरील खर्च कमी करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली होती. मात्र चहूबाजुंच्या टिकेनंतर न्यूयॉर्क पोलीस विभागाने त्वरीत बोस्टन डायनॅमिक्स सोबतचा करार रद्द केला होता.
मात्र आता पुन्हा डिजीडॉगची नियुक्ती करण्यात येत आहे. हे रोबोट कुत्रे फक्त बॉम्बच्या धोक्यासारख्या जीवघेण्या परिस्थितीत वापरले जातील. त्यामुळे याला घाबरण्यासारखे काही नसल्याचे पत्रकार परिषदेत महापौर एडम्स यांनी स्पष्ट केले.