मुंबई – महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ त्यांचे चिरंजीव पंकज यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पंकज भुजबळ यांनी जपानला जाण्यासाठीचा अनुमती अर्ज सुट्टीकालीन न्यायालय क्रमांक ५४ यांच्याकडे केला होता.न्यायालयाने त्यांचा अर्ज गुणवत्तेच्या आधारे मंजूर केला आहे
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना ग्रंथालय बांधकाम आर्थिक घोटाळा प्रकरणांमध्ये आरोपी असलेले छगन भुजबळ आणि त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांच्या संदर्भातली सुनावणी नियमित रीतीने विशेषतः पीएमएलए न्यायालयामध्ये या संदर्भातली ही सुनावणी सातत्याने सुरू होती.परंतु पंकज भुजबळ यांनी जपानला त्यांच्या कामानिमित्ताने जाण्यासाठीचा विनंती अर्ज न्यायालयात केला होता. या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गुणवत्तेच्या आधारे त्यांच्या अर्जाची पडताळणी केली आणि अखेर १० जून ते २० जून पर्यंत त्यांना मर्यादित स्वरूपात परदेशात जाण्याची अखेर अनुमती दिली.