नाशिक- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेच्या वेळेत आता बदल करण्यात आला आहे. तपोवनातील मोदी मैदानात होणाऱ्या या सभेसाठी आता सायंकाळ ऐवजी दुपारी १२ वाजेची वेळ निश्चित करण्यात आली आहे. या सभेची भाजपाकडून जय्यत तयारी सुरू असून आतापासूनच एनएसजी कमांडोंनी सभास्थळाचा ताबा घेतला आहे. याच दिवशी धुळे जिल्ह्यातही मोदींच्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे.
