नवी दिल्ली: सिडनी येथे २४ मे रोजी चार नेत्यांची होणारी बैठक रद्द झाली असली तरी पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे. नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. पंत्रप्रधान मोदी यांचा दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे. यावर आता आम्ही त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी म्हटले आहे.
या दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने मोदींचा शुक्रवारपासून सुरू होणारा तीन देशांचा दौरा जाहीर केला आहे. त्यानुसार, ज्यामध्ये २२ ते २४ मे या कालावधीत पंतप्रधान मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौरा समाविष्ट आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात, १९ ते २१ मे या कालावधीत जपानी शहर हिरोशिमाला भेट देणार आहेत. आणि जी-७ प्रगत अर्थव्यवस्थांच्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर मोदी जपानमधून पापुआ न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बी येथे जातील. जिथे ते २२ मे रोजी पंतप्रधान जेम्स मारापे यांच्यासमवेत फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन ची तिसरी शिखर परिषद संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात ते २२ ते २४ मे दरम्यान ऑस्ट्रेलियातील सिडनीला भेट देणार आहेत.