गळूरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौर्यात ते सहा जाहीर सभांना संबोधित करणार आहेत आणि दोन रोड शोही करणार आहेत.
पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी दिल्लीहून कर्नाटकच्या बिदर विमातळावर विशेष विमानाने उड्डाण करून त्यांच्या प्रवासाची सुरुवात केली. सकाळी ११ वाजता पहिल्या सभेसाठी ते बिदरहून हेलिकॉप्टरने हुमनाबादला गेले. त्यानंतर त्यांनी विजयपुरा येथे दुसरी सभा घेतली. तिथून त्यांनी बेळगावी जिल्ह्यातील कुडाची येथे जाऊन तिसरी सभा घेतली. त्यानंतर त्यांनी संध्याकाळी बेंगळुरू उत्तर येथे जाऊन रोड शो केला.
बेंगळुरू शहरात रात्रभर मुक्काम केल्यानंतर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता एका जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी र्नाटकच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या राजभवन येथून कोलारला जाणार आहेत. तिथे साडेअकरा वाजता ते जाहीर सभा घेतील. तिथून ते चन्नापटना जाऊन दीड वाजता सभा घेतील आणि शेवटची सभा हसन जिल्ह्यातील बेलूर येथे दुपारी पावणेचार वाजता आहे.
रविवारी संध्याकाळी मोदी यांचा दुसरा रोड शो म्हैसूरमध्ये होईल, त्यानंतर ते विशेष विमानाने दिल्लीला जातील. मोदी यांनी फेब्रुवारीपासून कर्नाटकचा नऊ वेळा दौरा केला आहे.
मोदी अलीकडेच वयाच्या ७२ व्या वर्षी ७ शहरांतून ५,३०० किलोमीटरहून अधिक प्रवास करून ३६ तासांत आठ कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे चर्चेत आले आहेत.
एकट्या कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणूक होणार असून, १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.