नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर निघाले. ते सर्वप्रथम हिरोशिमा येथील ‘जी-७’ शिखर परिषदेला उपस्थित राहिले. या शिखर परिषदेत १४ पॅसिफिक बेट देश सहभागी झाले होते. यावेळी मोदींनी तेथे इतर देशातील सर्व मोठ्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन सीईओ तसेच इतर मोठ्या व्यावसायिक नेत्यांशीही चर्चा केली.
या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून मी ‘जी-७’ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी हिरोशिमा, जपानला रवाना होत आहे. भारत-जपान शिखर परिषदेसाठी नुकत्याच झालेल्या भारत भेटीनंतर पंतप्रधान किशिदा यांना पुन्हा भेटून आनंद होईल. विशेषत: या परिषदेत माझी उपस्थिती विशेष अर्थपूर्ण आहे. कारण यावर्षी ‘जी-२०’ ची अध्यक्षता भारत करत आहेत. मी ‘जी- ७’ देश आणि इतर सर्व आमंत्रित देशांशी संवाद साधण्यास आणि एकत्रितपणे संबोधित करण्यास उत्सुक आहे. तिथे आम्ही शिखर परिषदेत सहभागी सर्व देशांसोबत जगासमोरील आव्हानांवर चर्चा करू. हिरोशिमा ‘जी- ७’ शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या काही नेत्यांसोबत माझी द्विपक्षीय बैठक होईल. ही माझी पहिलीच भेट असेल. मी २२ मे रोजी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मार्पे यांच्यासोबत फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्याच्या तिसर्या शिखर परिषदेचे संयुक्तपणे आयोजन करीन. मी कृतज्ञ आहे की सर्व १४ पॅसिफिक बेट देशांनी शिखर परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.’