परदेशी पर्यटकांना यापुढे कॅनडाचा दहा वर्षांचा व्हिसा मिळणार नाही

टोरंटो – कॅनडा सरकारने आपल्या व्हिसा धोरणामध्ये बदल केला असून यापुढे परदेशी पर्यटकांना दहा वर्षांचा व्हिसा दिला जाणार नाही.देशात वाढत चाललेल्या परदेशी नागरिकांमुळे घरांचा तुटवडा जाणवू लागल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.नव्या धोरणामुळे पर्यटकांना कोणत्या प्रकारचा व्हिसा द्यावा आणि त्याचा कालावधी किती असावा हे निश्चित करण्याचे अधिकार इमिग्रेशन विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या आधी दिला जाणाऱ्या दहा वर्षांच्या व्हिसावर पर्यटकांना कितीही वेळा देशात ये-जा करण्याची मुभा होती. ती आता बंद झाली आहे.इमिग्रेशन विभागाचे अधिकारी प्रत्येक अर्जाची बारकाईने छाननी करून कमी कालावधीचा व्हिसा देण्यावर भर देणार आहेत.त्यामुळे वारंवार कॅनडावारी करणाऱ्या परदेशी पर्यटकांची मोठी कुचंबणा होणार आहे.