बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे हे लक्षात येताच निदान आपला तरी पराभव होऊ नये म्हणून भाजपचे काही नेते निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये गेले तरीही त्यांना पराभवाचा फटका बसला. जगदीश शेट्टार हेही याप्रकारे पराभूत झालेल्या नेत्यांपैकी एक ठरले.
भाजपातून कॉंग्रेसमध्ये गेलेल्या जगदीश शेट्टार यांनी धारवाड-हुबळी मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना भाजपचे उमेदवार महेश टेंगिनाकाई यांनी ३५ हजाराहून अधिक मते मिळवून पराभूत केले आहे. माजी मुख्यमंत्री असलेले जगदीश शेट्टार यांना २९ हजार ३४० मते, तर भाजपचे महेश टेंगिनाकाई यांना ६४ हजार ९१० मते मिळाली आहेत. जगदीश शेट्टार हे येडीयुरप्पा यांच्या नंतरचे दुसर्या नंबरचे लिंगायत समाजाचे नेते आहेत.
पराभवाच्या भीतीने कॉंग्रेसमध्ये गेलेलेभाजपचे जगदीश शेट्टार पराभूत
