कराची : – पाकिस्तानमध्ये निवडणुका घ्यायला पुरसे पैसे सरकारकडे नाहीत. त्यामुळे विद्यमान पीडीएस सरकार निवडणुका घेण्यास टाळाटाळ करत आहे. अशातच सुप्रीम कोर्टाने पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमधील निवडणुकासांठी निवडणूक आयोगाला आदेश दिले. तसेच सुप्रीम कोर्टाने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला देखील निर्देश दिले आहेत की, या दोन्ही राज्यांमधील निवडणुकांसाठी 21 अब्ज रुपये प्रदान करावेत.
सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने आता स्टेट बँक ऑफ पाकिस्तानला आदेश दिले आहेत की, त्यांनी 72 तासांच्या आत निवडणूक आयोगाला 21 अब्ज रुपयांचा निधी द्यावा. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठासमोर झाली. या सुनावणीवेळी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या डेप्युटी गव्हर्नर सीमा कामिल आणि ॲटर्नी जनरल मन्सूर अवान यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पाकिस्तानात निवडणुकीचा मुद्दा तापला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात नियोजित वेळेत निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे.
पाकमध्येे निवडणुकांसाठी स्टेट बँकेला 21 अब्ज रुपये देण्याचे कोर्टाचे आदेश
