कराची- पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाईने कहर केला असताना आता नागरिकांनी भरमसाठ वीजबिलाविरोधात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. या नागरिकांनी वीजबिले भरणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
कोटली जिल्ह्यातील जनतेला तर गेल्या महिन्यात एकूण १३९ कोटी रूपयांची वीजबिले आली आहेत. ही बिले भरण्यास सर्वांनीच नकार दिला आहे. आतापर्यंत केवळ १९ कोटींची वीजबिले भरली गेली आहेत. जिल्ह्यात तब्बल १२० कोटींची थकबाकी आहे. खरे तर पाकिस्तान सरकार विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून या भागात नाराजी दिसत आहे. आता वाढीव वीजबिलाच्या निमित्ताने ही नाराजी उफाळून आली असल्याचे बोलले जात आहे. हा न्याय्य हक्कांचा लढा असल्याचे या पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचे म्हणणे आहे.