पाकिस्तानच्या १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली :

केंद्र सरकारने पाकिस्तानी अ‍ॅप्सविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने गुप्तचर संस्थेच्या (आयबी) इनपुटवरून पाकिस्तानमधून ऑपरेट केलेल्या १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर बंदी घातली. दहशतवादी या मोबाईल मेसेंजर अ‍ॅप्सचा वापर पाकिस्तानमधून मेसेज पसरवण्यासाठी आणि मेसेज प्राप्त करण्यासाठी करत होते.

दरम्यान, गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानचे १४ मोबाइल मेसेंजर अ‍ॅप्लिकेशन ब्लॉक केले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत पसरवण्यासाठी या अ‍ॅप्सचा वापर करण्यात येत होता. या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर दहशतवाद्यांनी काश्मीरमधील त्यांचे समर्थक आणि ऑन ग्राउंड वर्कर्ससोबत संवाद साधण्यासाठी केला होता. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘गुप्तचर संस्था ओव्हरग्राउंड वर्कर्स आणि दहशतवादी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरत असलेल्या चॅनेलवर लक्ष ठेवतात. संभाषणाचा मागोवा घेत असताना गुप्तचर संस्थांना असे आढळले की, मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे भारतात प्रतिनिधी नाहीत आणि त्यावरील घडामोडींचा मागोवा घेणे कठीण आहे.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top