वॉशिंग्टन – पाकिस्तानी संघाचा स्टार फलंदाज आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान अमेरिकेच्या रस्त्यावर नमाज अदा केली. रिझवानचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. रिजवान बोस्टनमध्ये रस्त्याच्या कडेला आपली कार थांबवून फूटपाथच्या बाजूला जमिनीवर कापड पसरून प्रार्थना करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
यापूर्वीही मोहम्मद रिजवान आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात नमाज अदा करताना दिसला होता. त्यांनतर मनोरंजन, प्रसारमाध्यमे आणि क्रीडा या विषयावरील हार्वर्ड शिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे सध्या अमेरिकेत आले आहेत.यावेळी हा व्हिडियो व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रिजवानची कार रस्त्याच्या एका बाजूला उभी केलेली दिसत आहे. तर दुसरीकडे मोहम्मद रिजवान रस्त्यावर कापड पसरून नमाज अदा करताना दिसत आहे. रिझवानचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही चाहते रिझवानचे कौतुक करत आहेत तर काही त्याला ट्रोल करत आहेत. यावर लोक विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करत इस्लामिक देश यूएईमध्येही असे घडत नाही आणि तसे केल्यास मोठा दंड भरावा लागतो. यावर काही जण थेट त्याच्यावर टीका करत आहेत.