कराड- सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दिवशी खुर्द परिसरात एका शेतकर्यावर रानगव्याने अचानक हल्ला केल्याने हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.लक्ष्मण कोंडीबा जाधव (५३)असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
लक्ष्मण जाधव हे शुक्रवारी दुपारी घराजवळच्या शेतात आपल्या शेळ्यांसाठी वैरण काढत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या रानगव्याने अचानक जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाता-पायावर मोठ्या जखमा झाल्या. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी जाधव यांनी आरडाओरडा करत बराच प्रयत्न केला.अखेर घराजवळच्या गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेत जाधव यांची रानगव्याच्या तावडीतून सुटका केली आणि त्यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
पाटण तालुक्यात रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
