पोर्ट मोरेस्बी
पापुआ न्यू गिनीमध्ये आज बुधवारी ३ मी रोजी ५.६ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पापुआ न्यू गिनीच्या वायव्येस असलेल्या अंबुंतीमध्ये हा भूकंप झाला. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर सार, भूकंपाचा केंद्रबिंदू अंबुंतीपासून १६ किमी अंतरावर पश्चिम-वायव्येला होता. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली ११२ किमी होती, मात्र जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
याआधीही ३ एप्रिल रोजी पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.३ इतकी नोंदवण्यात आली होती. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्रानुसार, भूकंपाची खोली पृथ्वीखाली ३८.२ किमी इतकी नोंदवण्यात आली. पापुआ न्यू गिनी हा ओशिनियामधील एक देश आहे. येथे अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. पापुआ न्यू गिनी भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाते. मार्च महिन्यातही येथे दोनदा भूकंप झाला होता. पापुआ न्यू गिनीमध्ये १ मार्च आणि १४ मार्च रोजी भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या महिन्यात एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचवेळी फेब्रुवारी महिन्यातही ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानुसार पापुआ न्यू गिनीमध्ये फेब्रुवारी ते मे या कालावधीत एकूण ५ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.