पामतेल आयातीत २९.२१ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली- खाद्यतेलाच्या आयातीसोबतच पामतेलाच्या आयातीमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. २०२२-२३ हंगामाच्या पहिल्या ११ महिन्यांत भारतात पामतेलाची आयात २९.२१ टक्क्यांनी वाढून ९०.८० लाख टन झाली आहे. पाम आणि खाद्यतेलाची ही वाढती आयात देशांतर्गत रिफायनर्ससाठी चिंतेची बाब असल्याचे सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईए) म्हटले आहे.देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतीत तीव्र घट झाल्याने परिणामी मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने अलीकडच्या काही महिन्यांत दरडोई वापर वाढला आहे.
पाम तेलाची वाढती आयात देशांतर्गत शुद्धीकरण उद्योगावर गंभीर करत आहे,अशी माहिती एसईएने दिली आहे. वर्ष २०२२-२३ च्या नोव्हेंबर-सप्टेंबर या कालावधीत एकूण शुद्ध तेल आयात २०.५३ लाख टनांवर पोहोचली आहे. जे मागील वर्षीच्या याच कालावधीत १७.१२ लाख टन होते. भारत हा जगातील वनस्पती तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. गेल्या हंगामात भारताने ७०.२८ लाख टन पामतेल आयात केले होते. २०२२-२३च्या नोव्हेंबर-सप्टेंबर दरम्यान देशाची एकूण वनस्पती तेलाची आयात २० टक्क्यांनी वाढून १५६.७३ लाख टन झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top