पालघर :- पालघर जिल्ह्यातील एका आरोग्य सेवा कंपनीला लागलेल्या आगीत गंभीररीत्या भाजलेल्या २८ वर्षीय कामगाराचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवारी लागलेल्या आगीत नागेंद्र गौतम ६० टक्के भाजला होता. त्याच्यावर ऐरोली बर्न्स रुग्णालयात उपचार सुरु होते. तारापूर एमआयडीसीमधील कंपनीला आग लागली होती. या आगीत दोन कामगार भाजले होते. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती पालघर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष प्रमुख विवेकानंद कदम यांनी दिली.