पालघर – पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील माता जगदंबाचा उत्सव (बोहाडा) यंदा नव्याने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे.
गेली काही वर्षे खंडित असलेला पण ३०० वर्षांची परंपरा लाभलेला हा
मोखाडा तालुक्यातील बोहाडा आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यासह दादरा नगर हवेली,नाशिक, इगतपुरी,भिवंडी,कल्याण येथील लाखो आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. जुन्या जाणत्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली नव्या स्वरुपात हा जगदंबा उत्सव खोडाळा येथे साजरा होणार आहे.आदिवासी बहुल पालघरमधील मोखाडा तालुक्यात साजरा होणारा
हा माता जगदंबाचा उत्सव (बोहाडा) प्रतीपदेपासून सुरू होतो आणि अष्टमीपर्यंत ही यात्रा चालते.मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा उत्सव दरवर्षी पार पडतो. हजारो आदिवासी समाजातील नागरिक या बोहाडा उत्सवाला आपली सर्व कामे बाजूला ठेऊन उपस्थित राहतात. यंदा खोडाळा येथील उत्सवाचे दुसरे वर्ष असून त्यानिमित्त जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. जगदंबा देवीच्या मिरवणुकीनंतर या उत्सवाची सांगता होते.या बोहाडाच्या दिवशी येथील जगदंबा मातेच्या मंदिरापासून ते वेशीपर्यंत पारंपरिक वाद्याच्या तालावर देवी-देवतांची वेशभूषा आणी मुखवटा परिधान केलेली सोंगं नाचवण्याची अनोखी परंपरा आहे.ही सोंगं बघण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात.रात्रभर ही सोंगं नाचवण्याची परंपरा चालत आली आहे. यात गणपती, हनुमान, वाघोबा, अशा ४०ते ५० देवी-देवतांची सोंगं नाचवली जातात.