मुंबई – मुंबईकरांची नैसर्गिक थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानला विशेष पसंती असते. मात्र पर्यटकांचे खास आकर्षण असणारी ‘माथेरानची राणी’ ‘मिनी टॉय ट्रेन सेवा खंडित करण्यात आली आहे. पावसाळ्यात नेरळ आणि अमन लॉजदरम्यानची ही प्रवासी सेवा खंडित करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
माथेरानला पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी पहायला मिळते.पावसाळ्यात येथील निसर्गदृश्य पाहण्यास पर्यटक मोठया संख्येने येतात.नेरळ ते माथेरान धावणारी ‘मिनी टॉय ट्रेन’ पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र आहे. मात्र पावसाळ्यात काही ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने ही सेवा बंद करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर १० जून ते १५ ऑक्टोबरपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या दरम्यान माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू राहतील. मात्र मध्य रेल्वेने नेरळ ते अमन लॉज दरम्यानची प्रवासी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.