पुणे
गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. अशा प्रवाशांची सोय व्हावी, या हेतूने पीएमपीएल जादा बस सोडणार आहे. एकूण २७० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान शहरात जादा बस धावणार आहेत. तसेच गणेशोत्सव दरम्यान पीएमपीएमएलची बससेवा रात्रभर सुरू राहाणार आहे. या बससाठी नियमित दरांपेक्षा ५ रुपये जादा दर आकारण्यात आला आहे. यामुळे भाविकांची सुविधा होणार आहे.
पुणे शहरात गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. यासाठी पुणे शहरात ७,००० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात ५,००० पोलीस कर्मचारी आहेत. तसेच गुन्हे शाखेचे पथकही आहे. इतरल ठिकाणांवरून १,३०० पोलीस कर्मचारीसुद्धा शहरात मागवले जाणार आहे. गणेशोत्सव दरम्यान दिवसभरातून चार वेळा बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तपासणी करणार आहे.