पुणे : पुण्याच्या सारसबाग येथील श्री महालक्ष्मी देवीला विजयादशमीनिमित्त परंपरेप्रमाणे सोळा किलो सोन्याची साडी नेसविण्यात आली. विजयादशमीच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्याची परंपरा आहे.सुमारे २३ वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील कारागिरांनी ही साडी तयार केली. ही साडी तयार करण्यासाठी कारागिरांना सहा महिने लागले होते. एका भक्ताने ही साडी देवीला अर्पण केली आहे. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता भाविकांची दरवर्षी गर्दी होते.यावर्षीदेखील भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला आले होते.
