पुण्यात पन्नास हजार वीज ग्राहक अंधारात

पुणे :

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने पुण्यातील नवले पूल ते कात्रज चौकादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या सर्रास उखडण्यात येत असल्याने वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ४५ ते ५० हजार वीजग्राहकांना याचा फटका बसत आहे. तसेच यामुळे मोठे आर्थिक नुकसानही होत आहे. याप्रकरणी कात्रज पोलिस ठाण्यात महावितरणकडून फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या कामास अद्याप गती आलेली नाही. हे काम आणखी काही काळ काम चालू राहील, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, तोडलेल्या वीजवाहिन्यांमुळे पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीजपुरवठा सुरू करणे, वीजवाहिन्यांची दुरुस्ती करणे, यासाठी अभियंते व कर्मचारी रात्रंदिवस धावपळ करत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top