पुणे : वारजे येथील न्यू अहिरे गावात एका नव्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये बिबट्या शिरला. आज सकाळी काही लोकांना बिबट्या दिसला आणि परिसरात गोंधळ उडाला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. वन विभागाला सुद्धा यासंदर्भात कळवण्यात आले. अचानक बिबट्या दिसल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाची रेस्क्यू टीम पोलिसांसोबत घटनास्थळी दाखल झाली. यानंतर तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले आणि बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले. बिबट्याला पकडण्याची तयारी सुरू असताना स्थानिक नागरिकांनी ही घटना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी घटनास्थळी वारजे पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील पोहोचले होते. पकडण्याची तयारी सुरू असताना बिबट्या शेडमधून पळाला होता. पण शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाचे कर्मचारी बिबट्याला दार्ट मारून बेशुद्ध करून घेऊन गेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ!