पुणे
पुण्यात लम्पी आजाराने पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून लम्पी आजाराने 94 जनावरे दगावली आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू असून हा आजार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी सांगितले.
पुण्यात जिल्ह्यात 2 हजार 502 जनावारांना लम्पी आजाराची लागण झाली. त्यापैकी 2 हजार 111 जनावरे बरे झाले आहेत. या आजारामुळे 94 जनावरे दगावली असून त्यात 29 गायी, 23 बैल आणि 42 वासरांना समावेश आहे. पशुसंवर्धन विभागाकडून लम्पीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यात 98.5 टक्के जनावरांचे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.
पुण्यात लम्पीचा कहर 94 जनावरे दगावली
