मॉस्को – रशियन राष्ट्राध्यक्षांचा प्रासाद क्रेमलिनवर काल रात्री ड्रोनने हल्ला करण्यात आला. हा हल्ला युक्रेनकडून करण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियन सैन्याने हे ड्रोन निकामी केल्याचा दावा केला.
रशियन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या क्रेमलिनवर बुधवारी दुपारी दोन ड्रोनने हल्ला केला. हा हल्ला झाला, तेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन ‘क्रेमलिन’मध्ये नव्हते. हल्ल्यानंतर क्रेमलिनच्या घुमटाजवळ आग आणि धुराचे लोळ दिसले होते. हा हल्ला म्हणजे युक्रेनने पुतीन यांची हत्या करण्यासाठी केला होता, असा आरोप रशियाने केला आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असेही रशियाने म्हटले आहे. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून या दोन देशांमधील तणाव वाढत आहे. मात्र या हल्ल्यानंतरही 9 मे रोजी रशियात विजय दिवस परेड दिवस होणार आहे.
पुतीनना मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोन हल्ला
