पुरस्कार परत देण्यावर सरकार चाप लावणार! शपथपत्रे भरून घेण्याची संसदीय समितीची शिफारस

नवी दिल्ली – पुरस्कार परत देण्यावर चाप लागावा म्हणून पुरस्कार विजेत्याकडून शपथपत्र भरून घेण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. देशात कोणतीही घटना घडल्यास अनेक नामवंत व्यक्ती सरकारी पुरस्कार परत करण्याचे पाऊल उचलतात. यापूर्वी अनेकांनी अशी पुरस्कारवापसी केली आहे. त्यामुळे सरकारची नाचक्की होते.

भविष्यात या पुरस्कारवापसीला चाप लावण्यासाठी शपथपत्र भरून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. पुरस्कार देण्याआधी विजेत्यांची सहमती घ्यायला हवी. राजकीय कारणामुळे पुरस्कार परत करू नये, असा संसदीय समितीच्या शिफारशीमागचा उद्देश आहे. परिवहन, पर्यटन व संस्कृती विभागाशी संबंधित स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top