पुलवामा – राष्ट्रीय तपास संस्थेने आज शनिवारी दहशतवादाशी संबंधित प्रकरणात जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात चार ठिकाणी छापे टाकले. गुस्सू, राजपोरा, अवंतीपोरा आणि त्राल येथे छापे टाकण्यात आले. यावेळी जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) कर्मचारीही उपस्थित होते. विशेष तपास युनिटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्यातल्या माहितीनसार, दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांमधील तीन संशयितांच्या शोधासाठी छापे टाकण्यात आले. छाप्यामध्ये काही साहित्य जप्त करण्यात आले.
पुलवामात एनआयएची चार ठिकाणी छापेमारी
