पृथ्वीच्या दिशेने सरकतोय २०० फूट मोठा ॲस्टरॉयड

नवी दिल्ली : नासा अवकाश संस्था अंतराळात होत असलेल्या बदलांची आणि त्याच्याशी संबंधित नवीन अपडेट्सची माहिती देत ​​असते. यावेळी नासाने पृथ्वीवर येणार्‍या नवीन धोक्याचा इशारा दिला आहे. कुतुबमिनार एवढ्या आकाराचा ॲस्टरॉयड पृथ्वीच्या दिशेने येत आहे. हा सुमारे २०० फूट मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, हा लघुग्रह या आठवड्याच्या शेवटीच पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेतून जाणार आहे. जर हा लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरला आणि पृथ्वीवर आदळला तर तो एखादं संपूर्ण शहर नष्ट करू शकतो. हा लघुग्रह अतिशय वेगाने पुढे सरकत असून त्याच्या समोर येणाऱ्या खगोलीय ग्रहाचा नाश करेल.सध्या हा लघुग्रह अंतराळात १००,००० मैल अंतरावर आहे. अवकाशात अनेक लघुग्रह फिरत असतात. ॲस्टरॉयड जवळून जाणं ही खगोलीय घटना आहे. पण एवढ्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वी जवळून जाणार ही फार दुर्मिळ घटना आहे, असे नासाने म्हटले आहे. अशी खगोलीय घटना दशकातून फक्त एकदाच घडते. नासाने शोधलेल्या या लघुग्रहाचे नाव २०२३ डिझेड-२ आहे. नासा ने सांगितले की, नासाने लघुग्रहाचे निरीक्षण केले असून हा लघुग्रह लवकरच पृथ्वीच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. नासाने एका महिन्यापूर्वी २०२३ डिझेड-२ नावाचा लघुग्रह शोधला आहे. हा लघुग्रह शनिवारी अमेरिकन स्थानिक वेळेनुसार चंद्राच्या ५१५,००० किमी जवळून जाण्याची शक्यता आहे. हा लघुग्रह सुमारे २८,००० किमी/तास वेगाने पृथ्वीच्या दिशेने पुढे सरकत आहे.

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, हा लघुग्रह शनिवारी चंद्राच्या कक्षेनंतर काही तासांनी हिंद महासागराजवळून सुमारे १७,५०० मैल प्रति तास वेगाने जाईल. पृथ्वी आणि चंद्राच्या जवळून हा ॲस्टरॉयड जाणार आहे. पृथ्वी जवळून लघुग्रह जाणे ही एक सामान्य घटना आहे. मात्र या लघुग्रहाचा आकार २०० ते ३०० फूट किंवा त्याहूनही अधिक असू शकतो. म्हणजेच तो कुतुबमिनार इतका मोठा असू शकतो. पृथ्वीजवळ येणारा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास होणारा विध्वंस विचारांच्या पलीकडचा असलैच शास्त्रज्ञांचे मत आहे. पण युरोपियन स्पेस एजन्सीचे प्लॅनेटरी डिफेन्सचे प्रमुख रिचर्ड मॉइसेल यांनी हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता फार कमी असल्याचे सांगितले आहे.

Scroll to Top