मुंबई- कच्च्या तेलाचे दर कमी होत आहेत. अशातच सरकारी तेल कंपन्यांनी आज अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या. आज सकाळी यूपी, हरियाणा आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ करण्यात आली. महाराष्ट्रात पेट्रोल १. ३० रुपयांनी महागले.
या दर वाढीनुसार दिल्लीमध्ये पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर, मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रति लिटर झाला आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. तसेच कोलकत्ता येथे पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२. ७६ रुपये प्रति लिटर आहे.