नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिल्लीच्या पुनर्विकसित इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ)च्या संकुलाच्या उद्घटनापूर्वी होम- हवन करण्यात आले. विस्तीर्ण आयटीपीओ कॉम्प्लेक्स, ज्याला प्रगती मैदान कॉम्प्लेक्स म्हणूनही ओळखले जाते. आज सकाळी १० वाजता संकुलाच्या उद्घाटनापूर्वी पीएम मोदी हे पूजा तसेच होम-हवन कार्यक्रमात सहभाग झाले. यावेळी आयटीपीओच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बांधकाम कामगारांचा सत्कार करण्यात आला. संकुलाच्या उद्घाटनासाठी अनेक पुजाऱ्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. याच संकुलामध्ये सप्टेंबरमध्ये जी-२० नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. हे कॉम्प्लेक्स अंदाजे १२३ एकरमध्ये पसरलेले आहे, ज्यामुळे ते भारतातील सर्वात मोठे संकुल बनले आहे.
प्रगती मैदानाच्या उद्घटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी होम-हवन केले
