न्यूयॉर्क – अमेरिकेतील प्रतिष्ठीत प्रिमन्टी रेस्टॉरंटने अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय व रिपब्लिकन पार्टीचे उपाध्यक्ष जे.डी.वेन्स यांना प्रचार करण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात या रेस्टॉरंटच्या मून टाऊनशिप येथील हॉटेलात कमला हॅरिस यांच्यासाठी प्रचार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष जे.डी.वेन्स हे आपल्या कार्यकर्त्यांसह दोन दिवसांपूर्वी पेनिन्सेल्विया येथील प्रिम्नटी रेस्टॉरंटमध्ये गेले. आपण ट्रम्प यांच्या प्रचारासाठी येथे येणार असल्याची पूर्वकल्पना त्यांनी आधीच दिली होती. असे असतानाही प्रिमन्टीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी प्रचार न थांबवल्यास पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली. त्यानंतर वेन्स यांच्या कार्यकर्त्यांनी रेस्टॉरंमध्ये एकच गोंधळ घातला. या प्रकारानंतर रेस्टॉरंटचे मालक प्रिमन्टी ब्रदर्स यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की, आमचे रेस्टॉरण्ट जेवायला येणाऱ्यांसाठी सदैव उघडे आहे.